
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्राम स्वराज्य महामंच च्या वतीने विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक विचारवंत साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती साठी ” उलगुलान परीषद ” चे आयोजन मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केले होते या परीषद मध्ये सहभागी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्रावण पाडसेनेकुन, सामाजिक विचारवंत,कोलाम समाज संघटना हे होते आणि सामाजिक कार्यकर्ते मा.चारुदत्त नेरकर साहित्यिक जेष्ठ नागरिक संघटना उपस्थित होते सोबत मा.कृष्णाजी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ मा विश्वास जी कुंभेकर आणि श्रीदेवी ताराबाई कोटनाके,प्रेमा पत्रीवार, सोनाली मरगडे उपस्थित होते विर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतीचा इतिहास,१८५७ चा स्वातंत्र्याचा इतिहास देशाबद्दल असलेली देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक क्रांती चा लढा या संदर्भात विस्तृत माहिती आणि प्रासंगिक प्रसंग मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी सविस्तर पणे “उलगुलान परीषद” मध्ये मांडनी केली. सामाजिक क्षेत्रात महिला चे स्थान अग्रक्रमाने घेतले जाते परंतु संधी ची समानता मीळावी आणि त्यांच्या सामाजिक कार्याला प्रेरणा मिळावी यासाठी “‘ विदर्भ विरांगणा ” म्हणून परीषद मध्ये सोनाली मरगडे आणि प्रेमा पत्रीवार यांना सन्मानित करण्यात यावे यासाठी परीषद मध्ये ठराव मंजूर करण्यात आला आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते परीषद मध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर यांचे विशेष मार्गदर्शन झाले आणि विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त उलगुलान परीषद ही क्रांतीकारक प्रबोधन कार्यशाळा झाली असे उद्गार अनेकांनी काढले म्हणून या उलगुलान परीषद चे आभार मा ताराबाई कोटनाके, गोंडवाना एकता परीषद यांनी मानले
- -
