औषध फवारणीने मेट येथील तरुणाचा बळी

प्रतिनिधी:- संजय जाधव

ढाणकी पासून जवळच असलेल्या मेट येथील तरुण अमोल सुरेश जाधव शेतात कीटकनाशकाची फवारणी करणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील मेट येथे ७ ऑक्टोबर रोजी घडली.

अमोल सुरेश जाधव (३२) असे मृतक युवकाचे नाव आहे. ते स्वतःच्या शेतात १ ऑक्टोबरला औषध फवारणी करीत होते. दरम्यान फवारणीचे औषध त्यांच्या शरीरात गेल्यामुळे इन्फेक्शन होऊन त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना ढाणकी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुसद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अशात त्यांची प्रकृती अधिक खालाविल्याने ७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुल, लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनस्तरावर या गोष्टीची दखल घेतली जाऊन त्यांच्या कुटुंबास शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.