
सहसंपादक : रामभाऊ भोयर
खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव व केंद्र यांचे वतीने, तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा -2025 चे आयोजन प्रतिभा आश्रमशाळा जळका येथे करण्यात आले आहे. दी. 25 डिसेंबर रोजी स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्याला आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक उईके उपस्थित असतील .कब -बुलबुल उत्सव,सांघिक व वैयक्तिक खेळ यात विध्यार्थी -विध्यार्थिनीं सहभागी होतील . विध्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा, त्यांच्या उपजत गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जळका येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुशीला शेराम, प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्या उषाताई भोयर,माजी प. सं. सदस्या शीला सलामे, उपसरपंच संजय पांडे, शाळा व्यव. समिती अध्यक्ष रवी डवरे, उपाध्यक्ष सोनाली आडे, लोकविकास संस्था सचिव संकेत राजगडकर व ग्रा. प. सदस्य व शाळा व्यव. समिती सदस्य जळका आदि मान्यवर उपस्थित राहतील.
या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार 27 डिसेंबर ला होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशीला तुमराम सरपंच जळका, बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,प्रमुख अतिथी तहसीलदार अमित भोईटे,गट विकास अधिकारी केशव पवार, पोलीस निरीक्षक शीतल मालटे, राळेगाव मुख्याधिकारी गिरीश पारेकर, सहा. गविअ. भारती इसाळ, गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कपिल गोटे, आर. एफ. ओ. मेघा गुंडलवार, शाळा व्यव. समिती अध्यक्ष रवी डवरे,सर्व ग्रा. प. व शाळा व्यव. समिती सदस्य ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.
तालुका स्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धेच्या हा तीन दिवसीय महोत्सव गट विकास अधिकारी केशव पवार, सहा. गविअ. भारती इसाळ, गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने, विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळका,राळेगाव केंद्रप्रमुख डॉ. कल्पना डवले, खैरी केंदप्रमुख हरिदास वैरागडे, वाढोणा केंद्रप्रमुख संजय पांडे, सावरखेडा केंदप्रमुख मुकेशचंद्र भोयर, धानोरा केंदप्रमुख दीपेश शेंडे, क्रीडा सचिव सागर इंझळकर, जि. प. शाळा जळका मुख्याध्यापक जगदीश ठाकरे व सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षकांवृंद विशेष शिक्षक परिश्रम घेतं आहे.
तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धे करीता जळका येथील प्रतिभा आश्रमशाळेचे मैदानात जय्यत तयारी करण्यात आली.योग्य नियोजना करीता विविध समित्यांचे गठन करण्यात आले. 25 डिसेंबर ला 10.30 वा उदघाट्ना नंतर सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा 6 ते 14 या दोन वयोगटात होतील. दी. 26 ला 11ते 14 वयोगटातील मुले -मुली कबड्डी, लंगडी व खो -खो चे सामने होणार आहे. शनिवार दी.27 ला 6ते 14 वयोगटातील कबड्डी, लंगडी, खो -खो स्पर्धत चूरस पहायला मिळेल. दु. 4 वा. बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे. यात राळेगाव तालुक्यातील सर्व शिक्षक -शिक्षिका सहभागी असतील.
