आंबे पिकवण्यासाठी होतोय रसायनांचा वापर,लिव्हर, किडनी होऊ शकते बाधित


प्रतिनिधी::प्रवीण जोशी यवतमाळ


बाजारातील चमकदार आणि पिवळा रसरसित आंब्याच्या बाबतीत दिसते तसे नसते म्हणून जग फसते ही म्हण तंतोतंत लागू होते. कारण असे बहुतांश आंबे दिसायला आकर्षक असले तरी ते शरीराला अपायकारक ठरू शकतात. आंबा लवकरात लवकर तयार होण्यासाठी काही रसायनांचा वापर केला जातो. मात्र त्यांचा वापर करून पिकवलेले आंबे किडनी, लिव्हर यासाठी त्रास देणारे ठरू शकतात, असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, देवगड येथून केशर, दशहरी, हापूस, लंगडा, पायरी, बदाम, गावरान आदी अशा विविध प्रकारचे आंबे येत आहेत. हे आंबे शहरातील विविध भागात असलेल्या छोट्या छोट्या गोडाऊनमध्ये उतरवण्यात येतात. त्यातील काही ट्रकमधील आंबे उतरण्यापूर्वीच केमिकलचा वापर करून पिकवलेले असतात, परंतु हे आंबे न पिकता केवळ त्यांना पिवळा, लाल रंग येतो. कच्च्या आंब्यावर बंदी असलेले कॅल्शिअम कार्बाइड आणि परवानगी असलेल्या इथिलीनचा वापर केल्यामुळे आंबा लवकर पिकतो. मात्र ते आंबे शरीरासाठी अपायकारक आहेत.

बाजारात केमिकल सहज उपलब्ध

बंदी असलेल्या रसायनाने आंबे, इतर फळ पिकवणे अन्न सुरक्षा व मानके या कायद्यानुसार गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळलेल्यास पाच वर्षे शिक्षा आणि लाखो रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. मात्र कडक अमलबजावणी
होत नसल्यामुळे रसायनांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.

:

केमिकलने पिकवलेल्या फळांच्या सेवनामुळे स्लो पॉयझनिंग होते. याची तीव्रता कमी प्रमाणात असली तरी दीर्घकालीन आजार उद्भवू शकतात. यात कर्करोग, घशात खवखव पेस्टीक अल्सर, मळमळणे, अपचन, चक्कर येणे, झोप न येणे, स्मरणशक्ती कमी होणे असे विविध आजार होऊ शकतात.