रावेरी येथील बचत गटाच्या महिलांची राळेगाव पोलीस स्टेशनला धडक राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक गावात दारूचे दोन दुकाने कोणाच्या आशीर्वादाने?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

रावेरी गाव एक ऐतिहासिक गाव असून रावेरी गाव हे संपुर्ण सोयी सुविधांनी संपन्न असून गावात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील काही समाजकंटकांनी अवैध दारूचा व्यवसाय सुरू केला त्यामध्ये गावातील कुटुंबातील प्रमुख जे काही आपली रोजीरोटी करून उदरनिर्वाह करत होते त्यातील संपूर्ण पैसे व्यसनाधीन झाल्यामुळे दारूमध्ये घालत आहे आणि गावात मिळत असल्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊन प्रत्यक्ष दारू पिऊन आपल्या घरचा संसार उध्वस्त करीत आहे त्याकरिता गावातील महिलांनी आज रोजी पुढाकार घेऊन दारू बंदी संदर्भात गेल्या दोन वर्षापासून कोरोणा काळामध्ये सुरू असलेल्या दारू च्या संदर्भात लेखी स्वरूपात दोनदा पोलीस स्टेशन राळेगाव यांना विनंती करून सुद्धा गावातील दारू बंद होत नाही त्याकरिता त्याच्यावर उपाय योजना करण्याकरिता रावेरी येथील बचत गटाच्या महिलांनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशन वर आज रोजी धडक घेतली त्यामधील गावातील 40 ते 50 महिला हजर होत्या तसेच गावातील ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य व काही अन्य मान्यवर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष हे सुद्धा हजर होते परंतु रावेरी एक गाव तालुका मध्ये आदर्शगाव राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे गाव असल्याने त्यावर पोलिस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने बचत गटाच्या महिलांना आज रोजी पोलीस स्टेशन वर धडक देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात रावेरी येथील महिला सामोर राहील आणि गावातील दारूबंदी करतील असा दृढनिश्चय तालुक्यातील जनतेकडून करण्यात येत आहे व राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक गावात दारूचे दुकान असल्याचे समजते. एक अर्ध गाव सुटले असेल तर सुटले असेल नाही तर प्रत्येक गावात दारूचे दुकान चालू करण्याची परवानगी कोणी दिली असे प्रश्न प्रत्येक गावातील नागरिक करीत आहे. याकडे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन ही सर्व दुकाने बंद करावी. अशी बचत गटांच्या महिला व गावकऱ्यांची मागणी आहे.