कवी विनोदकुमार आदे यांचा “टुकार” काव्यसंग्रहाचे नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत प्रकाशन

वणी :नितेश ताजणे

नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत नुकतेच वणी येथील हरहुन्नरी कलावंत, साहित्यिक विनोदकुमार आदे यांचा “टुकार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले.
प्रभू राजगडकर यांनी रितसर साहित्य परिषदेचे उद्घाटन केले आणि “टुकार” या काव्यसंग्रहाचे कौतुक करत म्हणाले की समाजातील वेदना, दुःख, अन्यायाचे शब्द रूप लिखाण म्हणजे खरे साहित्य होय, हे ग्रंथातून उजागर करून वाचन संस्कृती वाचविली पाहिजे.

प्रा. वसंत कनाके यांनी प्रास्ताविक केले प्रथमतः सांगितले ही साहित्य परिषद वीरांगना राणी दुर्गावती मडावी स्मृति पर्व निमित्याने घेतली असून, ही साहित्य परिषद कै. राजाभाऊ राजगडकर साहित्य नगरी , वसंत जीनिग हॉल मध्ये ही परिषद होत आहे. साहित्य परिषदेचा आराखडा मांडून म्हणाले साहित्य गुलामगिरी निर्माण करण्यासाठी लिहिले जात नाती तर गुलामाला गुलामगिरीची जाणीव व्हावी म्हणून साहित्य निर्माण केले जाते. पुढे ते म्हणाले आदिम अस्मिता अस्तित्वाचा शब्द रूप अविष्कार म्हणजे आदिवासी साहित्य आहे, व टुकार कवितासंग्रहावर प्रकाश टाकून काही कवितेचे वाचन केले.

टुक टूक पाहाता पाहता
अन्याय अत्याचार झाला!
माणसातला देव उभा
कधी कामी नाही आला.!!

21 व्या शतकातील राजकारण “टूकार” नेतागिरीचे कसे झाले, याचे वर्णन कवी विनोदकुमार आदे यांनी आपल्या नेता या कवितेत चित्रित केले.
बॅनरवर थोरापेक्षा
चोराचे फोटो मोठे झाले
पैदल फिरणाऱ्या बोंग्याचे
बार आणि फार्म हाऊस झाले….

यवतमाळमधील जेष्ट साहित्यिक प्रा. वसंत कनाके लिखीत
“आदिम क्रांतीसुर्य वीर बाबुराव शेडमाके (चरित्र ग्रंथ) हा देखील याचवेळी प्रकाशित करण्यात आला आहे

या साहित्य परिषदेत उषाकिरण आत्राम, दशरथ मडावी, बि. डी आडे, गीत घोष, अशोकभाऊ नागभिडकर, विनोद वाडेकर, प्रा. शितल ढगे, प्रब्रम्हानंद मडावी, रामदास गेडाम, सुवर्णा वरखडे, छाया ऊईकें, डॉ अरविंद कुळमेथे, एम. के कोडापे , विनोदकुमार आदे, बाळकृष्ण गेडाम, रजनीताई पोयाम, आशाताई कोवे, रिताताई आदे, यांचेही मार्गदर्शन लाभले.

यावेळी कैलासवासी व्यंकटेश आत्राम आदिवासी साहित्य रत्न पुरस्कार आणि कैलासवासी मधुकरराव मडावी आदिवासी साहित्य भुषण पुरस्कार प्रत्येकी दहा हजार रुपये कुसूम आलाम आणि उषाकिरण आत्राम यांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.तसेच निळकंठराव जुमनाके, आशिषाभाऊ खुलसंगे, अशोकभाऊ नगभिडकर, बी. डी. आडे, ल. सू. राजगडक त्यांचे सामाजिक. साहित्य क्षेत्रातील योगदान बाबत सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार व मुख्याध्यापक अनिल ढेंगळे यांचाही मंचकावर सत्कार करण्यात आला.

उद्घाटन समारंभ सत्राचे संचालन रामचंद्र आत्राम यांनी केले तर आभार धनराज मेश्राम यांनी मानले. परिसंवाद सत्र “स्त्री आज काल उद्या या विषय सत्राचे प्रास्ताविक छायाताई उईके तर संचालन आशा कोवे यांनी केले आभार रिनाताई आदे यांनी मानले. कविसंमेलनाचे बहारदार संचालन करुन कविसंमेलनात रंगत भरण्याचे सुंदर, अप्रतिम सादरीकरणाचे काम विनोदकुमार आदे यांनी केले
जुल्मी व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या स्वरचित कवीता व आजच्या स्थितीवर विनोदाने प्रत्येक कवीच्या सादरीकरणाला अनुसरून प्रभावी निवेदणाने रसिक श्रोत्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले
त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल व तसेच उत्कृष्ट पत्रकारितेतील योगदानाबद्दल मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला
.

ह्या कविसंमेलनात पन्नास कविंनी आपले कवितांचे सादरीकरण केले असून या कविसंमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींचे आभार दत्ता गावंडे यांनी मानले.