धक्कादायक,कृषी व महसूल च्या वादात तालुक्यातील ४१८८ शेतक-यांचे अनुदान रखडले संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांत रोष…

संग्रहित

वणी :नितेश ताजणे

यावर्षी अतिवृष्टी, पुर या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुर्णतः आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान शासनाकडून अनुदान मिळत असल्याच्या भाबड्या आशेने शेतकरी बॅंकेचे उंबरठे झिजवत भाऊ अनुदान जमा झाले काय जी? म्हणत खाली हाताने परत जातांना दिसुन येत आहे. परंतु त्यांना काय माहिती की त्यांचे अनुदान तलाठी आणि कृषी विभागाच्या वादात अडकले आहेत! तालुक्यातील तब्बल ४१८८ शेतकऱ्यांचे केवायसी पेंडींग असल्याने व तलाठ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे मदतीचा निधी तहसीलदारांच्याच खात्यात पडून आहे. या प्रकाराबाबत अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सविस्तर असे की, यापूर्वी पीएम किसान योजनेचे काम करण्यावर कृषी विभागाने बहिष्कार टाकला होता. त्यावेळी तलाठ्यांनी योजनेचे काम पूर्णत्वास नेले. आता नैसर्गिक आपत्ती काळात कृषी सहायक व तलाठ्यांनी नुकसानीचे संयुक्त पंचनामे केले. आता मदत वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या नावाची इंग्रजी यादी तयार करण्याच्या सूचना आहेत. हे काम तलाठ्यांकडे सोपविले आहे. कृषी विभागाचे काम आमच्यावर थोपविले जात असल्याचा आरोप करत तलाठ्यांनी याद्या तयार करण्यावर बहिष्कार टाकला आहे. शासनाच्या निकषानुसार कामकाज करताना एकूण खर्चाच्या ०.२५ टक्के रक्कम तलाठ्यांना खर्चासाठी देण्याचे आदेश आहेत; मात्र आजपर्यंत अशी मदत मिळाली नाही. यामुळे नाराज तलाठ्यांचा फटका अतिवृष्टीग्रस्तांना बसत असुन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. संगृहीत फोटो सर