
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा:- तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील रहिवाशी श्री. प्रकाश उद्धव आरके वय ६० वर्ष हे आपल्या बोरगाव शिवारात असलेल्या शेतपिकाला इंजनाच्या सहाय्याने पाणि देन्याकरीता दिनांक १५/११/२०२३ बुधवारला सांयकाळी ६:०० वाजता गेले होते मात्र ते सकाळी घरी परतले नसल्याने कुंटुबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली पोंभूर्णा तथा उमरी पोतदार पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल करण्यात आली होती चार दिवस लोटूनही सदर इसमाचा कुठलाही थांगपत्ता लागत नव्हता अखेर शेतातील विहीरीत व सभोवतालच्या परिसरात शोधमोहिम सुरू करण्यात आली तेव्हा विहिरीच्या बाजूला असलेल्या खड्यात सदर इसम जाऊ शकतो असा अंदाज येताच विहिरीत उतरून शोधशोध केली असता त्या व्यक्तीने आपल्या सोबत नेलेली टार्च आढळून आल्याने विहिरीच्या काठावर असलेल्या खड्याला जेसीपीच्या सहाय्याने अंदाजे २० ते २५ फुट खोदकाम केले असता प्रकाश आरके यांचा मृतदेह आढळून आले पोलीस प्रशासन व गावतील नागरीकांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने प्रेत बाहेर काढण्यात आले असून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे पाठविण्यात आले घटनेचा पूढील तपास उमरी पोतदारचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री. किशोर शेरकी सर यांच्या मार्गदर्शणात पोलीस कर्मचारी श्री. कुमरे मेजर तथा टिम करीत आहे.. मृतक प्रकाश आरके यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मूले, एक मूलगी नातवंड असा बराच मोठा आप्तपरीवार असून त्यांच्या अशा अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
