
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भंडारा -महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे संलग्नित भंडारा जिल्हा सर्व स्तरीय कलाकार संस्था तुमसर तालुका शाखा मोहाडी च्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक भव्य महोत्सवाचे आयोजन मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव येथे 10 व 11 जानेवारी 2026 ला रोज शनिवार व रविवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा च्या पटांगणावर आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाचे उद्घाटन जागेश्वर मेश्राम सरपंच कान्हाळगाव यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खुशाल कोसरे सदस्य मानधन समिती भंडारा, मदन शेंडे सदस्य मानधन समिती भंडारा ,महेंद्र वाहने माजी सदस्य मानधन समिती भंडारा, बाळू बोबडे, कांचनताई निंबार्ते, मुन्ना निंबार्ते,शिवशंकर सव्वालाखे ,सुनील चवळे ,डॉ.पुरुषोत्तम बोंद्रे सचिव गांधर्व कलाकार संस्था , रंगराज खराबे सदस्य मानधन समिती नागपूर, मारुती निंबार्ते, शाहीर अरुण मेश्राम, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, पत्रकार तथा भीमशिहीर प्रदीप कडबे, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, यांना अभिवादन करून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव भांबोरे व पत्रकार तथा भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या शाल,पुष्प, सन्मानचिन्ह, व सन्मानपत्र, देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सहभागी सर्व कलाकार यांना सुद्धा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेशराम देशमुख संस्थाध्यक्ष यांनी केले. या दोन दिवसीय कार्यक्रमात कलाकारांनी नाटक, तमाशा, गोंधळ, भारुड कलापथक, दंडार ,कीर्तन, भजन, डहाका, गायन ,वादन ,नकलाकार ,नृत्य , शाहीर,पोवाडा. विविध सांस्कृतिक सादर करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्यारेलाल उचीबगले अध्यक्ष प्रतिष्ठान कलावंत प्रतिष्ठान भंडारा,,वसंत कुंभरे ,घनश्याम पठारे ,मधुकर फुलबांधे ,मंगेश मानापुरे, अशोक बुधे, गीता रामटेके ,नरेश देशमुख, राजूभाऊ गजभिये, मनराज भुरे ,मारुती निंबार्ते,श्रीमती कल्पना कामथे,प्रभाताई पाटील ,शिला झंजाळ, मारुती निंबार्ते, दुर्वास बावणे, दुर्गादास बावणे भरत नागोसे ,निलकमलबाई गोंडाणे ,सुषमा टिचकुले , यांनी सहकार्य केले.
