
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव येथील वकील संघटनेचे सदस्य अँड फिडेल बायदानी यांच्या मृत्यने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आले असून आज दिं २२ जून २०२३ रोजी राळेगाव येथील न्यायालयात तालुका वकील संघातर्फे अँड फिडेल बायदानी यांना श्रद्धांजली अर्पण करून श्रध्दांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला आहे.या श्रध्दांजलीपर कार्यक्रमाला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वि वि जटाळ सह दिवाणी न्यायाधीश डी आर कुलकर्णी यांनी अँड फिडेल बायदानी यांच्या बदल मनोगत व्यक्त करतांना
ॲड फिडेल बायदानी
हे विद्वान विधिज्ञ होते त्यांचा अभ्यास भरपूर होता, दिलखुलास सर्वांशी मिळून मिसळून राहणे असा त्यांचा स्वभाव होता, ही वकिली व्यायसायकरिता खुप मोठी हानी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच
ॲड प्रीतेश वर्मा यांनी तालुका वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲड फिडेल बायदानी हे नेतृत्व, कतृत्व, आणि वकृत्वाचे धनी होते, संघर्षाचा काळ ओलांडत त्यांनी अनेक व्यक्तींना न्याय मिळून दिला होता, त्यांच्या हातात यश होते परंतु नियातीला काही वेगळेच मान्य होते व ते आपल्यातून निघून गेले असे मत व्यक्त केले त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तालुका वकील संघाचे तालुकाध्यक्ष अँड प्रितेश वर्मा सदस्य अँड मंगेश बोबडे, अँड प्रफुल चौहान, अँड किशोर मांडवकर, अँड मधुसूदन अलोने, अँड संदेश झांबड, अँड मोहन देशमुख, अँड संदीप राडे, अँड रोशनी वानोडे अँड अफसर काझी, अँड चेतन गलाट, अँड अनिरुद्ध भोयर,अँड दीक्षांत खैरे, अँड गायत्री बोरकुटे, अँड प्रशांत लांजेवार, अँड वैशाली लोंढे, अँड आकाश कवडे, अँड रुपेश सागरकर, अँड निलेश गोंडे,अँड संजय धुपे, अँड वैष्णवी मुके, अँड वैभव पंडित अँड योगेश ठाकरे, अँड शुभम नरमशेट्टीवार आदी संघटनेचे सदस्य तथा नागरिक यावेळी उपस्थित होते.
