
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मान्सून अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असताना खरीप हंगामातील पेरणीसाठी बी बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्राची वाट धरली असून बियाणे खरेदी बरोबरच डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी केली जात आहे परंतु शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावर अवलंबून न राहता पर्यायी खताचा वापर करण्याचे आवाहन पंचायत समिती राळेगावच्या कृषी अधिकारी मनीषा पाटील यांनी केले आहे.
राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांना कडून डीएपी खताची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते .परंतु डीएपी खताचा तेवढ्या पपुरवठा मर्यादित होत असल्याने डीएपी खताची कमतरता भासू लागते मात्र शेतकऱ्यांनी डीएपी खतच न वापरता पर्यायी खताचा वापर करावा या पर्यायी खताचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी
डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे.एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-१६ टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे.
तसेच एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-१०.२६.२६ एनपीके-२०.२०.०.१३ एनपीके- १२.३२.१६ व एनपीके-१५.१५.१५ या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो.
त्याच बरोबर टिएसपी (Triple Super Phosphate) या खता मध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असुन डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल डिएपी खतास उत्तम पर्याय आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी डीएपी खतावरच अवलंबून न राहता इतरही खताचा वापर करावा असे आवाहन कृषी विभाग पंचायत समिती राळेगाव च्या वतीने करण्यात आले आहे
