
मागण्या-
१)हिंगणघाट शासकीय मेडीकल कॉलेजसाठी उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर जागा निश्चित करण्यात यावी.
२) महाराष्ट्र सरकारने वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) ला तालुका घोषित करण्यात यावा.
३)हिंगणघाटला जिल्हा घोषीत करण्यात यावा.
हिंगणघाट:- ०१ जुलाई २०२४
हिंगणघाट शासकीय मेडीकल कॉलेजसाठी उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर जागा निश्चित करण्यात यावी तसेच महाराष्ट्र सरकारने वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) ला तालुका घोषित करण्यात यावा तसेच हिंगणघाटला जिल्हा घोषीत करण्यात यावा वरील सर्व मागण्यासाठी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी दिनांक २७ जुन २०२४ पासुन धरणे आंदोलन सुरू केले अस्ता संघर्ष समितीचे शिस्त मंडळ तसेच मोठ्या संख्येने महिला सहभागी होऊन आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलना मध्ये सहभाग घेत आंदोलन पुडे नेत सुरु ठेवले.
दि ३० जुन २०२४ ला केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली सुद्धा करण्यात आली.
शासकीय मेडिकल कॉलेजसाठी वर्धा जिल्हाधिकारी ह्यांचा वेळा येथील प्रायव्हेट जागेचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला.राजकीय दबाव तंत्र वापरून ह्यांनी हिंगणघाट शहरातील लोकांवर केलेला अन्याय आहे.स्वतःचा आर्थिक फायदासाठी हे मेडिकल कॉलेज वेळा येथे पळवले असा समज सध्या नागरिकांमध्ये आहे.सरकारी दवाखान्याच्या आजू बाजूला धनाढ्य व्यापारी आणि राजकीय लोकांना भविष्यात व्यापार करायला जागा उपलब्ध नाही म्हणून ते कॉलेज वेळाला पळवत आहे अशी चर्चा शहरात जोरात सुरू आहे.हिंगणघाटला ४०० बेड हॉस्पिटलला मंजुरी व बांधकामासाठी १५१ कोटींच्या निधीचा जनप्रतिनिधी कडुन मोठा गाजावाजा करण्यात आला होता.१०० बेड सारखीच ४०० बेडची भविष्यात अवस्था राहणार असल्याने जनसामान्यांच्या १५१ कोटींचा चुराडा कशासाठी? असा प्रश्न हिंगणघाट शहरातील नागरिकांना पडत आहे.
संघर्ष समितीने दाखविलेली जागा नागरिक व प्रशासनाच्या सोयीची असुन रहदारीच्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने सर्वाच्या दृष्टिने हितकारक आहे.असे असतांना हया जागेबाबत काय अडचणी आहेत हे अजुनही आम्हाला कळले नाही. मेडीकल कौन्सीलचा सदस्यांना ही जागा दाखविण्यातच आली नाही अशी चर्चा आहे.
उपजिल्हा रूग्णालय हिंगणघाट येथे ४०० खाटांचे रूग्णालय मंजुर झाले असुन तरतुत केलेली आहे. ती जागा उपजिल्हा रूग्णालयाच्या मागील शासकीय जागेवर आहे.शासनाने १५१ कोटीची तरतूद केलेली आहे.
वरील सर्व मागण्यासाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे सह माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी आफताब खान, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे माजी उपसभापती तथा संचालक मधुकरराव डंभारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरीश वडतकर, माझी नगरसेवक दीपक माडे, सुजाता जांभुळकर,रागिनी शेंडे, सीमा तिवारी,दिपाली रंगारी, सुजाता जीवनकर,मीना ढोकणे, गीता मेश्राम,चंदा येलेकर,शीला राजूरकर,सुनिता तळवेकर,कुसुम हजारे,नंदा बावणे,पंचफुला नैताम, संगीता कुडुमते,रेखा मडावी,सुनीता तामगाडगे, शितल तिवारी,अक्षदा जीवनकर,सुरेंद्र बोरकर,सुनील हरबुडे,बेबी कोल्हे, मंगला थुटे,मंदाकिनी ढाले,सुनीता भोयर, सुनिता चंदनखेडे,सिंधू चावरे,छाया जांभुळकर, सुलोचना भगत,संभा भगत,मोरेश्वर राऊत, केशव इंगळे,राजू उमाटे,संजय कांबळे,विलास बाळबुदे, मोहन दाभाडे,मंगेश कापटे,अतुल पाटील,दिवाकर घोरपडे,अशोक झाडे,रविदास विरुळकर,रवींद्र छापेकर,विशाल कोल्हे,बाळा दौलतकर,विनोद वानखेडे, मोहन कलोडे,प्रमोद वरभे,राजू गोल्हर, तेजस तडस,नयन निखाडे,प्रमोद फुसे, संजय काळे, प्रकाश बावणे,विठ्ठलराव मानकर,गजानन वाघमारे,आनंद गौरख,ऋषि थुल,अनंता साबळे, हरीभाऊ काकडे,शकील अहमद, अब्दुल हमीद,अनंत तपासे,विजय बोरकर,अजय मडावी,अनिल ताकसांडे,राम गाठे,अनिल साळवे, रवि नौकरकर इत्यादी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनाला बसले आहे.
