सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे विश्व आदिवासी दिन साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

श्री सत्यसाई बहुदेशिय शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचालित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे विश्व आदिवासी दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.

त्यामध्ये आदिवासी समाजातील समाज सुधारक यांच्या जीवनावर आधारीत भाषणे झालीत. ज्यामध्ये प्रा रंजना तिरनकर, वाल्मीक आडे सर, यांनी आपली मते व्यक्त केली व वर्ग दहावी ची विद्यार्थिनी कु.समीक्षा किंनाके हिने आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व भाषणं स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य सचिन ठमके सर होते. तर प्रमुख अतिथी श्री सत्यवान सिंह दुहांन, सुनीता सत्यवान दुहांन उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सामूहिक नृत्य मध्ये इयत्ता दहावी च्या विद्यार्थिनी तन्वी दडांजे, नेहा तोडसाम, श्रुती टेकाम, आचल टेकाम, स्विटी टेकाम, पुनम रामपुरे, सुप्रिया टेकाम, साक्षी देवतळे यांनी सहभाग घेतला होता. आणि बिरसा मुंडा यांच्या वेशभुषा मध्ये इयत्ता नववी चां विध्यार्थी वंश पुसनाके होता. तसेच गोंडी गीत तुषार केरांम व अमर पवार यांनी सादर केले.तर ढोल ची साथ पियूष सेडमाके व तन्मय मेश्राम यांनी दिली आणि संगीत शिक्षक विजय चांदेकर व अतुल तांदुळकर उपस्थित होते.
कार्यक्रमांचे संचालन वर्ग बारावी विज्ञान चा विद्यार्थी सुकेश मेटकर यांनी केले. तर रमण सिडाम आभार यांनी मानले .