

खैरी (वडकी)येथील लग्नाच्या स्वागत समारंभ कार्यक्रम करुन परत यवतमाळ लोहरा येथे जाताना घडला अपघात
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी येथुन लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ लोहारा येथे लग्न समारंभ करिता स्कूल बस ने जाणाऱ्या पाहुण्याच्या उभ्या बसला राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ ट्रकने जबर धडक दिल्याने चार जण ठार झाले, असुन पंधरा जण जखमी झाले आहेत ही घटना मध्यरात्र दोन वाजताच्या सुमारास घडली आहे,त्यात मृतकात 1)श्रुती गजानन भोयर वय 12 वर्ष, 2) परी गजानन भोयर वय 10 वर्ष, 3)लीलाबाई पातुरकर वय 42 वर्ष, 4) निलेश चाफेकर वय 40 वर्ष सर्व राहणार घोंसा पांढरकवडा हे मुत पावले असून खैरी वरून कार्यक्रम आटपवून यवतमाळ लोहार येथे राळेगाव मार्गे जात असताना आयसर MH 26 H 8444 हा कळंब वरून येत असताना व स्कूल बस MH 37 B 6823 यांच्यात भीषण टक्कर झाली अशी माहिती प्रत्यक्षधर्शी यांनी सांगितले व तेव्हाच राळेगाव वरुन यवतमाळ येथे जाणारे सचिन दरणे यांनी राळेगाव येथिल प्रविण महाजन यांना अपघाताची माहिती दिली तेव्हा पोलिस अधिकारी व प्रविण महाजन, सचिन दरणे, बाळू धुमाळ ,वशिम पठाण ,यांनी जखमीला राळेगाव येथील रूग्णालयात दाखल केले व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जखमीला यवतमाळ येथिल शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन मृत्यू पावलेल्या चार पैकी दोन अल्पवयीन मुली एकाच घरच्या असल्याने हळवळ व्यक्त करण्यात येत आहे.
