
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत मौजा वरुड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामातील कपाशी पिकाची पहिली शेतीशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.
या शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी, खते व बियाण्यांचे योग्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फळबाग लागवड व महाविस्तार ॲप याविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमास उप कृषी अधिकारी कोषटवार साहेब, आत्मा विभागाचे तंत्र अधिकारी पारसकर साहेब, समूह सहाय्यक शामल राऊत तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सचिन आत्राम उपस्थित होते.
शेतीशाळेत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध कृषी विषयांवर चर्चा केली तसेच खरीप हंगामातील कपाशी पिकाच्या नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली. कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत खरीप हंगामात कपाशी पिकासाठी आयोजित करण्यात आलेली ही पहिली शेतीशाळा असून, शेतकऱ्यांमध्ये आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
