
सहसंपादक : रामभाऊ भोयर
छत्रपती चौक राळेगाव येथे वरली मटका नावाचा जुगार लोकांना खेळ खेळवीत असणाऱ्या आरोपीला राळेगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक १८ जुलै २०२५ रोज शुक्रवारला ७:१५ ते ७:५५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष पाम्पंट्टीवर हा लोकांकडून पैसे घेऊन हारजीत ची बाजू लावून वरली मटका नावाचा जुगार लोकांना खेळ खेळवीत होता खेळ खेळत असल्याचा संशय पोलिसांना आला असता पोलिसांनी धाड टाकून मनीष पाम्पंट्टीवर यांचा पंच समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे खिशात नगदी २०३० रु व वरली मटका साहित्य व एक बाँल पेन किमत १० रुपये असा एकुण २०४० रु चा मुद्देमाल मिळुन आला. सदरची कार्यवाही मा. पोलिस निरीक्षक शीतल मालटे यांचे मार्गदर्शनात एपी आय दंदे ,ए एस आय गोपाल वास्टर, एन पि सी सुरज चिवाने यांनी केली.
