
प्रतिनिधी:प्रवीण जोशी
ढाणकी.
ढाणकी शहराजवळून काही अंतरावर असलेल्या बिटरगाव(बू )येथे श्रीराम प्रभू यांच्या जीवनावर आधारित संगीतमय राम कथा सोहळ्याचे आयोजन केले असून यांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान गावकऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रमास शासनाने निर्बंध घातले होते. पण आता महामारीच्या प्रादुर्भाव कमी झाला आणि सर्वच कार्यक्रमास सुरुवात झाली याला अनुसरून गेले अनेक दिवसांची धार्मिक कार्यक्रमाची परंपरा बिटरगाव (बु) येथे चालू आहे. आणि गेल्या कित्येक दिवसांपासून ती प्रथा व परंपरा अखंड पने गावाने सुद्धा तितक्याच तत्परतेने जपून धार्मिकतेचे मूर्तिमंत उदाहरण पंचकोशीत जपलं आहे. सर्वच भक्तिमंडळ यांनी निर्णय घेऊन ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमंतराय कलशरोहन द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून मर्यादा पुरुषोत्तम व युगपुरुष व दिलेला शब्द पाळून शब्द ब्रह्म उपासक अशी ख्याती असलेल्या श्रीराम प्रभू चे संगीतमय राम कथे चा सोहळा आयोजित केला असून या ठिकाणी नित्य नेमाने कार्यक्रमा होणार असून शुक्रवार दिनांक, २०/०१/२०२३ते गुरुवार दिनांक २६/०१/२०२३, पासून या सुरुवात होणार आहे. तसेच सकाळी ९ ते ११ व रात्री ८ ते १० या वेळेस रामायणचार्य भीमाशंकर स्वामी यांच्या मंगलमय व सुमधुर वाणीतून संगीतमय रामकथा होणार असून याचा लाभ आजूबाजूच्या छोट्या सर्व वाड्या वस्तीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त बिटरगाव(बु) येथील गावकऱ्यांनी केले असून २४.१.२०२० रोजी रात्री लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असेल तर दिनांक २६/ १/ २०२३ ला श्रीराम कथेची सांगता होईल आणि तदनंतर २७/१/२०२४ ला श्रीराम ग्रंथनगर शोभायात्रा निघेल आणि श्री भीमाशंकर स्वामीं यांचे काल्याचे किर्तन आणि सांगता होऊन दिनांक २७/१/२०२३ दुपारी १२ चे पुढे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाची सांगता होईल.
