विरोधकांच्या कुरघोड्या सुरूच, स्वतंत्र उमेदवार प्रशांत बदकी पॅक झाल्याची अफवा उमेदवारांचे बॅनर फाडण्याचे प्रकार सुरू

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

स्वतंत्र उमेदवार सर्वांवर भारी पडत असल्याची चर्चा

बोर्डा गावात काही लोकांकडून प्रशांत बदकी हा स्वतंत्र उमेदवार पॅक झाल्याची अफवा पसरविण्याचे काम करीत आहे. ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्वतः प्रशांत बदकी यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.बोर्डा गावात काही लोकांकडून अश्या अफवा पसरविण्याचे काम खूप जोमात चालते.या वरून स्वतंत्र उमेदवार इतरांना भारी पडत असल्याचे बोलले जात आहे.
बोर्डा गावात ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून बोर्डा गावातील तरुण पिढी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.त्यामुळे ज्या उमेदवारांनी या आधी गावातील विकासकामांसाठी प्रयत्न केले अश्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचे प्रकार सुरू आहे .वांदिले हार्डवेअर जवळ प्रशांत बदकी या स्वतंत्र उमेदवाराने लावलेल्या बॅनर ला काही अज्ञात लोकांनी फाडल्याची घटना घडली आहे .

उमेदवाराचे बॅनर फाडून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे .