
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुलांनी शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा परिधान केली होती. अनेक मुलींनी जिजामातेसारखी वेशभूषा परिधान केली होती. याप्रसंगी मुलांनी शिवाजी महाराजांविषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निलेशभाऊ गुजरकर(शा.व्य. समिती अध्यक्ष )तथा प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंच सौ. मनीषाताई वानखेडे, उपसरपंच अभयभाऊ मासुरकर हे होते. यावेळी श्री समिरभाऊ गुजरकर(पोलीस पाटील),सौ. कविताताई धोटे,श्री नामदेवरावजी हुलके,श्री अतुलभाऊ लांभाडे, सौ. शुभांगीताई बेहरे,सौ.सीमाताई चांदेकर,श्री नरेंद्रभाऊ आत्राम, श्रीमती तडस ताई,शुभमभाऊ धोटे,श्री भाष्करभाऊ महाजन उपस्थित होते. याप्रसंगी मुलांनी शिवजन्म गीतावर छान नृत्य केले. उपस्थित सर्व मंडळींनी मुलांचे खूप कौतुक केले.यावेळी तालुकास्तरीय कब व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यानां मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रविण्य प्राप्त केल्यामुळे मार्गदर्शक शिक्षक श्री दौलतकर सर यांचा देखील सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री गुप्ता सर तथा संचलन श्री दौलतकर सर यांनी केले.आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका सौ महाकुलकर मॅडम यांनी केले.
