ऋतुजाताई लटके यांचा अंधेरी येथील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाल्यानंतर ढाणकी शहरात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा.


प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी


दिनांक 6 नोव्हेंबर रोजी ढाणकी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अंधेरी येथील ऋतुजाताई लटके यांनी विरोधकावर दणदणीत मात करून प्रचंड मतांनी विजयश्री खेचून आणली त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाला एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करून दिला. व याचाच आनंद उत्सव शिवसैनिकांनी फटाके फोडून साजरा केला यावेळी पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत दोन गट स्थापन झाल्यामुळे स्वतःच्याच पक्षातील नेते एकमेकांची विरोधक झाले व पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख व संपूर्ण देशाला मार्गदर्शक राज्य म्हणून ओळख असताना अशी राजकीय बंडाळी राज्याला परवडणारी नाही. नक्कीच या पोटनिवडणुकीतील विजयामुळे या पक्षाला एक नवीन आत्मविश्वास व एक वेगळी झळाळी मिळेल एवढे नक्की.