प्रत्येक सर्वे मध्ये अशोक मेश्राम यांना पसंती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत जेवढे सर्वे सोशल मीडियावर फिरत आहे त्यात पहिल्या पसंतीचे मत अशोक मारुती मेश्राम यांनाच देण्यात आली आहे.यावरुन असे दिसून येते की राळेगाव तालुक्यातील मतदारांना बदल हवा आहे.राळेगाव तालुक्यातील राजकारण दोन आजी -माजी आमदार महोदया भोवती 35 वर्षांपासून फिरत आहे.आता जनता त्याच त्या उमेदवाराला पुरती कंटाळली आहे.तेच ते मुद्दे,त्याच त्या भुलथापा, निवडणूक आली की भुमिपूजन यामुळे जनता हैराण झाली आहे.आपली पोटली भरण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विकास मतदारसंघात दिसत नाही.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लढत असलेले उमेदवार अशोक मारुती मेश्राम यांच्या कडे मतदार मोठ्या आशेने बघत आहे की मतदारसंघात असाच उमेदवार निवडून यावा.मा.राजसाहेब ठाकरे यांनी अशोक मारुती मेश्राम यांचे मतदारसंघासाठीचे व्हिजन बघुन, उमेदवाराला निवडून आणण्यासाठी 5 नोव्हेंबर ला ते या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहे.