
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील एका खेड्या गावातील एका शेतकऱ्यांची मुलगी जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये एका उच्च पदावर जावून आपल्या गावाचेंच नाही तर राळेगाव तालुक्याचे सुध्दा नाव अमेरिका पर्यंत पोहोचविले आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावालगत असलेल्या एका दुर्गम भागातील चाचोरा गावातील शेतकरी मोहन लाड यांची मुलगी डॉ पर्वणी विद्या मोहन लाड ही २८ आक्टोंबर रोजी मुंबई वरून जर्मनी ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे जगातील सर्वात मोठी क्रृझ कंपनी द राॉयल प्रिंसेस कृझ अलास्का अमेरिका येथे पब्लिक हेल्थ आॉफिसर म्हणून नियुक्ती झाली सदर या पदावर ही पहिलीच भारतीय महिला असल्याने गावा सह परिसरातील शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. माझी मुलगी एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर लागने आमच्या साठी व विशेष म्हणजे माझ्या गावांसाठी खुपचं गौरवास्पद आहे. सौ. विद्याताई मोहन लाड चाचोरा
