
वाशिम – शहरातील पुसद नाका चौकात तसेच उड्डाणपुलानजीक निर्माण झालेल्या खड्यांच्या दुुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात शुक्रवार, ६ जानेवारी रोजी खड्डयाचे श्राध्द घालुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर एमएसआरडीसीच्या उपअभियंत्यांना आंदोलनस्थळी निवेदन देण्यात आले.
शहरातील पुसद नाका चौकात मध्यभागी तसेच उड्डाणपुलानजीक मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यामुळे खड्डयाला तलावाचे स्वरुप आले आहे. यामुळे रहदारीला मोठा त्रास होत आहे. यासंदर्भात मनसेच्या वतीनेवारंवार दिलेल्या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे दिलेल्या इशार्यानुसार खड्डारुपी तलावाचे श्राध्द घालून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन कुटे, उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, रिसोड ता. उपाध्यक्ष लक्ष्मण वानखेडे, सचिव धनीराम बाजड, वाशीम शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले, प्रतिक कांबळे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष रघुनाथ खूपसे, रिसोड तालुकाध्यक्ष वैभव वानखेडे, जनहितचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, महेश देशपांडे, महिला सेनेच्या वंदना अक्कर, बेबी कोरडे, प्रमिला इंगळे, जयश्री कांबळे, रेखा चव्हाण, माला बागरे, प्रमिला थोरात, शमिनाबी लुकमान शहा, सचिन दोडके, गौरव तोष्णीवाल, सर्कल अध्यक्ष अनिल मुसळे, शाखाध्यक्ष सुधाकर मुसळे, सतिश मुसळे, आशिष काळे, विभाग अध्यक्ष संतोष वैरागडे, शाखा अध्यक्ष बाळू वानखडे, शाखा उपाध्यक्ष आकाश जिरवणकर, महाराष्ट्र सैनिक शुभम कांबळे, महादेव इंगोले, पवन डूबे आदींनी सहभाग घेतला. आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता.
