वणी तालुक्यात फसवी टोळी सक्रिय….
टोळी शोधण्याचे पोलिसां पुढे आवाहन :- दागिने चमकविण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक?


वणी तालुका हा अतिशय वर्दळीचा तालुका म्हणून सर्वत्र परिचित आहे. तसेच वणीला ब्लॅक डायमंड सिटी असे सुद्धा म्हटले जाते. वणी सह तालुक्यात सध्या भांडे वाले, मणी बीऱ्या, सोने चांदी चमकवून देणे, आदी प्रकरचे फसवेगिरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या व काहींची या टोळीकडून फसवणूक झाल्याच्या सुद्धा घटना समोर आल्या आहे. दरम्यान अशा टोळ्यांना शोधून त्यांना अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर असुन वणी सह परिसरातील जनतेने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीला घरात येऊ न देता त्यांना धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणीत काही महिन्या अगोदर अशा आंतरराज्यीय टोळ्यांनी फसवेगिरी करून अनेकांना आपल्या जाच्यात घेत फसविल्याचे आढळले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नवीन वागधारा येथील सौ प्रिती ईश्वर जेंगठे यांचे घरी काही मणी बीऱ्या विकण्याकरिता दोन महिला आल्या होत्या दरम्यान अगोदर त्यांनी आपल्या प्रेमाच्या बोलण्यात प्रीती यांना घेत त्यांच्यावर आपला विश्वास कायम केला. नंतर आम्ही सोने चांदी चमकवून देत असतो तुम्हाला याकरिता दुसऱ्याठीकानी जायची गरज नाही. तसेच प्रिती यांनी त्या दोघींचे म्हणणे ऐकुन आपले चांदीचे चाळ व अंगठी त्यांना दिली मात्र सदर चाळ व अंगठी त्यांनी तिला साफ करून दिली त्यानंतर प्रीती ला विश्वास पटला व त्यांनी सुद्धा प्रेमळ बतावणी करून आपल्या प्रेमाच्या बतवणीने प्रितीला त्यात खेचत त्या महिला दिनांक 29 जुलै 2023 ला प्रीतीच्या घरी दुपारी अंदाजे 4 वाजताच्या दरम्यान आल्या व प्रितीला सांगत होत्या की तुझे काही सोन्याचे पोत किंवा, दागिने असेलतर दे ते साफ करून देतो अशी बतावणी करीत असताना अगोदर प्रीतीने नकार दिला मात्र तिची मुलगी शाळेतून आली व तिने सुद्धा आई दे साफ करून देतील ते दागिने असे म्हटले व त्यानंतर तिथे एक बाई आणखी आली व तिने सुद्धा दे पोत व दागिने ते साफ करून देतील अशी बतावणी केल्यावरून प्रितीने आपली सोन्याची पोत व कानातले त्यांच्या स्वाधीन केले मात्र त्या महिलांना कानातले व पोत दिल्याबरोबर त्यांनी तिथुन पळ काढला आणि रफुचक्कर झाले. थोड्यावेळाने प्रिती यांनी तिच्या पतीला माहिती सांगितली व त्यांना काही कळेनासे झाले दरम्यान आपली फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इकडे तिकडे पाहायला गेले असता त्या फसव्या टोळीने आपला पळ काढला होता व ते परिसरात दिसून आले नाही. त्यांनी रीतसर वणी पोलिसांत तक्रार दाखल केली असुन सदर प्रकरण तपासात आहे.
अशा टोळ्यांना जेरबंद करण्याची गरज निर्माण झाली असुन वणी सह परिसरातील जनतेने सावध राहण्याची गरज आहे तसेच अशा टोळ्यांना शोधण्याचे पोलिसांसमोरही मोठे आवाहन आहे.