
. ————————————————————————————–
सहसंपादक : रामभाऊ भोयर
**
डोंगरखर्डा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परीसरात सर्व बुध्द विहार मध्ये जाऊन आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजन केले होते या सम्यक संकल्प दिनाचे औचित्य साधून मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, यांनी विशेष मार्गदर्शन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भावपूर्ण आदरांजली अर्पण केली* ग्रामीण भागात सामाजिक शिक्षण, आणि आरोग्य शिक्षण ही चळवळ निर्माण होणे गरजेची आहे समाजातील तरुण पिढी व्यसनेच्या आहारी गेली आहे, सामाजिक शोषण मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात दिसून येत आहे म्हणून समाजातील युवक आणि ग्रामीण भागातील समाज प्रेमी यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी शिका संघटित व्हा, हा सम्यक संकल्प आम्ही डोंगरखर्डा आणि झाडकिन्ही येथे दिला गावातील तरुण पिढी व्यसनापासून मुक्त व्हावी यासाठी गावा गावात समाज मंदिर, बुध्द विहार, सार्वजनिक सभागृहात ” ग्राम वाचनालय ” निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु असे आश्वासन मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी दिले या सम्यक संकल्प दिनाचे औचित्य साधून मा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परीसरात सर्व बुध्द विहार मध्ये जाऊन आदरांजली अर्पण केली आणि बुद्धवंदना केली या कार्यक्रमात सहभागी मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा कृष्णा जी भोंगाडे , जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ नितीन ठाकरे, सागर उमरे , बाबाराव गायकवाड, नरेंद्र डुकरे प्रल्हाद काळे लक्ष्मण किनेकर जिवतोडे सुरेश गराट अविनाश कुमरे सर्व समाज बांधव गावकरी महिला पुरुष सहभागी झाले होते *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सागर उमरे यांनी मानले
