
सहसंपादक: रामभाऊ भोयर
जिल्ह्यात जवळपास १६०० दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्रलंबित दाखवत आहे.तरी ज्या दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी केली असेल त्यांना पुढील ७ दिवसात सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे येऊन प्रमाणपत्र मिळवून घ्यावे असे आवाहन महाविद्यालयाकडून दिव्यांग व्यक्तींना करण्यात आले.
दिव्यांग व्यक्ती ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नसेल त्यांना जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी व आपल्या नजदीक असलेल्या प्रमाणपत्र वितरण केंद्र जसे श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ, ग्रामीण रुग्णालय आर्णी, ग्रामीण रुग्णालय वणी, उपजिल्हा रुग्णालय दारवा, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, उपजिल्हा रुग्णालय पुसद या केंद्रावर जाऊन प्रमाणपत्र मिळवून घ्यावे.
दिव्यांग व्यक्ती ज्यांना दिलेले प्रमाणपत्र मान्य नाही किंवा टक्केवारीशी ते सहमत नाही अशा व्यक्तीने जे.जे हॉस्पिटल मुंबई येथे अपील करावी अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.श्री. अनिल बत्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाबा येलके ,शल्य क्रियाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय पोटे , अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ.जय राठोड, नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ जोशी,कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ.रामेश्वर पवार ,उपवैध्यकीय अधिक्षक डॉ.अमर सुरजुशे, डॉ. दुर्गेश देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद कुळमेथे यांनी दिली.
