प्रकाशा पुलावर बेवारस वाहन सापडल्याने खळबळ, पोलिसांचा शोध सुरू

प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी

नंदुरबार: प्रकाशा येथे तापी नदीच्या पुलावर एक बेवारस मोटरसायकल आढळून आली आहे. वाहनाच्या आजूबाजूला व परिसरात तपास केला असता कोणीही आढळून न आल्याने विविध तर्क लढविले जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ६ जून रोजी तापी नदीच्या पुलावर संध्याकाळी स्थानिक नागरिकांना एम.एच.39.ए ए 1422 या क्रमांकाची मोटरसायकल आढळून आली. सदर वाहनात आधार कार्ड सापडले असून ते नंदुरबार येथील एका महिलेचे असल्याचे समजते. आधार कार्ड वरील नाव व वाहनाच्या नोंदणी वरील नाव एकच आढळले आहे. सदर महिलेने नदीत उडी घेतली की अजून काही कारण आहे, यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.