तरुणाने व्यसनाकडे न वळता योगासन कडे वळावं,सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा

तन आणि मन याचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग- प्रा. विनोद राठोड

प्रतिनिधी फुलसावंगी: संजय जाधव


भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असल्याचे प्रतिपादन येथील सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दीना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महाविद्यालताचे प्राचार्य प्रा. विनोद राठोड यांनी उपस्थित शिक्षकांना सभोधित करतांना व्यक्त केले.

भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले जात आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा.

21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जग भर साजरा केला जातो. या निमित्ताने महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रा.अंकुश कुसनेनिवार , प्रा. रितेश चंदेल , प्रा. बाळू आडे, प्रा. समाधान हिंगाडे, रितेश जाधव व शिक्षकेतर कर्माच्यारी अविनाश मुनेश्वर कार्यक्रमास उपस्थित होते.