
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अकाली पावसाने मोठा कहर कल्याने तालुक्यात अनेक घरांची पडझड तर वीज पडून तीन म्हशींचा मृत्यू तर एका बकरीच्या अंगावर बाभरीचे झाड पडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना राळेगाव तालुक्यात घडली आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिधोरा, सावरखेडा, विहीरगाव, वडकी,खैरी, कोंची, सह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू असून अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपीट, व वादळी पाऊस, पडला असुन तालुक्यात प्रचंड वादळाने घरावरील टीन पत्रे उडाली तर काही भागातील झाडे उन्मळुन पडली, व विद्युत पोल सुद्धा वाकले आहे.वडकी येथील डॉक्टर नरेंद्रजी इंगोले यांच्या शेतात बैल बांधून असल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे मुळापासून उलमडून पडले परंतु यात जीवित हानी थोडक्यात टळली. सदर सावरखेडा परिसरातील सुभानहेटी येथील शेतकरी मोगरे यांच्या गोठ्यावर वीज पडून तीन म्हीशींचा जागीच मृत्यू झाला तर प्रवीण चीडाम यांच्या गोठ्यावर बाभळीचे झाड पडून एका बकरीचा जागीच मृत्यू झाला तर विहीरगाव येथील विद्युत पोल वाकली असल्याने तीन दिवसापासून वीरगाव येथील लाईट बंद आहे. तर रिधोरा येथील अविनाश बाबाराव जावादे यांच्या घराचे छप्पर उरल्याने घरातील धान्य व इतर वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदैवाने यामध्ये जीवित हानी टळली आहे. तर वैशाली विवेक चौधरी यांच्याही घरावरील टीन पत्रे उडून गेल्याने याच्याही घरातील जीवन उपयोगी लागणाऱ्या वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर वडकी येथील कीशोर पवार यांच्या घरावरील टावरचे काचे फुटली आहे. सदर तालुक्यात सावरखेडा, विहीरगाव,रिधोरा,वडकी परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांनी मोक्का पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांची होत आहे
