महाविद्यालयीन अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल राहूल मानमोडे याचा सत्कार

कारंजा (घा):- दिनांक १०/३/२०२३ रोज शुक्रवारला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची स्मृतिदिन संपुर्ण भारतात साजरी करण्यात आली. त्याचप्रकारे कारंजा येथील स्व. नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कला व वाणिज्य महाविद्यालय कारंजा घाडगे येथे सुध्दा महाराजांची जयंती व सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन संयुक्तपने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोंचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कारंजा येथील शासकीय आयटीआय येथून यिन महाविद्यालयीन विद्यार्थी अध्यक्ष पदावर राहूल मानमोडे व शहरातील खासगी आयटीआय येथून मयूर किनकर यांची निवड झाल्याबद्दल या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुष्गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विचारपिठावर उपस्थित प्रमूख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली व मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाला कॉलेज मधील विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.