बोरगडी तांडा येथे बैलपोळा सण शांततेत साजरा, तांड्यातील मानाच्या बैल जोडीचामान येथील धेना नाईक परिवाराकडे….

हिमायतनगर /- कृष्णा राठोड


कोरोणाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच बोरगडी गवामद्ये मागील दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून मानाच्या बैल जोडीची पूजा तांड्यातील नाईक, कारभारी, यांच्या हस्ते संपन्न झाली व ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने आपल्या बैल जोडीची सजावट करून गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मारुती मंदिराजवळ विवाह लावले यावेळी शेतकऱ्यांनी सजवलेली सर्जा राजा एका पेक्षा एक भारी अशी बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.तालुक्यात मागील चार दिवसापासून शेतकऱ्यांनी आपल्या साथीदाराला सजविण्याची जोरदार तयारी सुरू केली होती मागील काळात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना देखील यावर्षी शेतकऱ्यांनी सावकाराची उसनवारी पैसे घेऊन आपल्या बळीराजाला सजवण्यासाठी बाजारपेठेतून साहित्य खरेदी केले आणि आपली बैलजोडी अधिकाधिक कशी आकर्षक दिसेल यासाठी बाजारपेठेतून कासरा , गोंडे ,बाशिंग दोरखंड,इत्यादी साहित्याने सजवले होते. येथील तांड्यातील मनोहर पंडित राठोड यांच्या मंगलाष्टकांनी विवाह सोहळा संपन्न केला हा बैलपोळा सण बोरगडी गावा सह तांड्यातही मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा झाल्याचे दिसून आले.

यावेळ तांड्याचे नाईक- अमर्सिंग लिबाजी राठोड, कारभारी- रामराव गुणाजी राठोड, पोलीस पाटील -प्रेमराव सेवा राठोड व गग्रामपंचायत सदस्य- शामराव धेना राठोड, रॊहिदास श्रवण जाधव, विठ्ठल आडे यासाह शेतकरी बांधव गावकरी, महीला मंडळ यावेळी मोट्या संख्येत उपस्थित होते.