
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका ग्राम रोजगार सेवक अध्यक्षपदी रिधोर येथील विलास पवार , तर उपाध्यक्षपदी पिंपरी दुर्ग येथील प्रीतम इंगोले,तर सचिव पदी दहेगाव येथील राजु लांडे, तर कोषाध्यक्षपदी झरगड येथील शुभम झाडे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदर ही निवड महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना प्रदेश अध्यक्ष विलास जोगदाडे रजिस्ट्रेशन नंबर ५७७५ यांच्या मार्गदर्शना खाली.तर राळेगाव पंचायत समिती मधील एमआरजीएस विभागात कार्यरत असणारे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी वाईकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्राम रोजगार सेवक संघटना स्थापना करण्यात आली आहे. सदर संघटना स्थापन करतेवेळी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक प्रवीण खेवले , मयुर जुमळे, बंटी नहाते, नितेश तिवाडे, दीपक दूधकोहळे , सुनील पायघन, संदीप राऊत, शंकर घडले, बलदेव राठोड, दिनेश कोडापे, संजू कांबळे , माणिक देवनरे, मंगल राऊत, तुषार भोरे, विनोद भोयर, गणेश येटी, अनिल बावणे, यशवंत वैद्य, प्रभुदास बावणे उपस्थित होते
