
_
श्री सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचलित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडकी यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण यशाचा नवा मानदंड प्रस्थापित करत तालुक्यातील सर्वोच्च शैक्षणिक यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई १२वी आणि १०वी बोर्ड परीक्षांमध्ये शाळेने १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे संपूर्ण वडकी तसेच राळेगाव तालुक्यात शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शाळेच्या १२वीच्या सीबीएसई विज्ञान आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शाळेच्या प्रबळ शिक्षण व्यवस्थेला हे यश सिद्ध करते.
(CBSE) विज्ञान शाखेतील निकाल पुढीलप्रमाणे आहे –
१) कृतिका खांदणकर – ९२.४%
२) सुहानी शिंदे – ९०.८%
३) राणी कोवे – ८७.६%
(Humanities) कला शाखेतील निकाल –
१) रोशन करपाटे – ८९.८%
२) श्रुती मेश्राम – ८७.४%
३) नेहा पवार – ८७%
इयत्ता – दहावी(CBSE) १००% निकाल
१) श्रेयसी गोटेफोडे – ९४.८%
१) समृद्धी झांबरे – ९४.८%
२) तृप्ती देथे – ९३.६%
३) जानवी पांगुळ – ९२.२%
या यशामागे शाळेच्या प्राचार्य श्री सचिन ठमके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ते स्वत: सीबीएसईचे अधिकृत रिसोर्स पर्सन असून त्यांचा अभ्यासू दृष्टिकोन व आधुनिक अध्यापन पद्धती शाळेच्या प्रगतीला नेहमीच पूरक ठरला आहे. संस्थेचे सचिव श्री सत्यवान सिंग दुहन आणि संस्था समितीचे अध्यक्ष रणधीर सिंग दुहन यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच सक्रिय सहभाग घेतला आहे.
या यशाबद्दल वडकी गावासह संपूर्ण राळेगाव तालुक्यातून सैनिक पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन यांचे कौतुक होत आहे. अनेक सामाजिक संघटना, पालक व स्थानिक प्रतिनिधींनी शाळेला शुभेच्छा दिल्या असून हे यश संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.शाळेने दाखवलेले हे यश केवळ गुणांच्या आकड्यांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे. शिस्त, आधुनिक शिक्षण पद्धती, विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि अनुभवाधारित शिक्षण यामुळेच सैनिक पब्लिक स्कूलने तालुक्यातील इतर शाळांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.हे यश भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल आणि विद्यालयाच्या प्रगतीचा प्रवाह यापुढेही अधिक वेगाने वाहत राहील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
