
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नागपूर मिस्टर अँड मिस महाराष्ट्रच्या ऑडिशनमध्येच ओम ट्रस्टच्या यावतीने मिस मिस्टर यवतमाळ यांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मिसच्या स्पर्धेत मिस यवतमाळ म्हणून राळेगाव तालुक्यातील खैरी येथील कोमल दिलीप तंगडपल्लीवार ही मिस यवतमाळ ची मानकरी ठरली तर फस्ट रनर उप पूर्वा मुळे व सेकंड भक्ती दुधे सहविनर ठरली.विदर्भातील युवक व युवतींना आपल्या सौंदर्य, कलागुणांच्या जोरावर मिस महाराष्ट्र ते मिस इंडियापर्यंतचा प्रवास आता सोपा होणार आहे. यासाठी ओम सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मिस्टर अँड मिस महाराष्ट्र व किड्स अँड मिसेसचे ऑडिशन यवतमाळ येथे ७ एप्रिलला जाजू कॉलेज धामणगाव रोड यवतमाळ येथे आयोजन झाले. यवतमाळ जिल्ह्यातून शेकडो स्पर्धक या ऑडिशनकरिता उपस्थित झाले होते त्यामध्ये खैरी येथील कुमारी कोमल दिलीप तंगडवलीवार ही मी यवतमाळ ची विजेती ठरली तसेच या ऑडिशनकरिता आशिष जाजू, रितेश चांडक यांनी उपस्थिती लावली. तसेच या स्पर्धेला जुरी महणून लाभलेले डॉ. निकिता चव्हाण, वैभव तडस, इंगळे व स्नेहा जुरी म्हणून काम पाहिले. या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती डॉ. अंजली गवालें,डायरेक्टर गवालें पाईल्स हॉस्पिटल, मिसेस महाराष्ट्र, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष कीर्ती राऊत, वर्षा चव्हाण, आकाश बुराड भाजप जिल्हाध्यक्ष युवामोर्चा, रोहित राठोड हे सचिन जोशी, प्रवीण जोशी, भारत जोशी, विक्रम चिंडाळे, अमित नानेतकर, ओम चिंतामणी, ऋषिकेश कदम, सरिता नदि, अलका कोथले यांचे अस्तित्व मेकअप ग्रुप प्रफुल उरकुडे फोटोग्राफी पार्टनर हे उपस्थित होते.
रायगाव तालुक्यातील खैरी या खेडेगावातील एका मुलीने शहर विभागात मिस यवतमाळ सारख्या आयोजनामध्ये सहभागी होऊन अनेक स्पर्धांमध्ये मिस यवतमाळची विजेती ठरलेल्या कुमारी कोमल दिलीप तंगडपल्लीवार हिचे खैरी गावासह तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर सगळीकडून अभिवंदनाचा वर्षाव होत आहे.
