धक्कादायक : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, दोन मुलीवरही केले कुऱ्हाडीने वार

निर्घृण हत्येने जिल्हा हादरला

पोंभुर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा तालुक्यातील पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दीतील डोंगर हळदी(माल) येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना दि. ०६ जून पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत.

मृतक पत्नीचे नाव आशा मनोज लेनगुरे वय (३८) वर्ष तर जखमी मुलींमध्ये अंजली मनोज लेनगुरे वय (१७) वर्ष,पुनम मनोज लेनगुरे वय(१२) वर्ष असे आहे. दोन्ही मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी यांच्यावर भादवी कलम ३०२, ३०७, ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती मनोज लेनगुरे (वय ४०) याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील घटनेचा तपास उमरी पोतदार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेरकी करीत आहेत.

#