
राळेगाव येथील नाफेड केंद्रावर १४ मार्च २०२३ पासून चणा खरेदीला सुरवात करण्यात आली असून खरेदी करण्याचा कामाला वेग आला आहे .नाफेड केंद्रावर १४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान १७ दिवसात ८ हजार २४३ क्विंटल, किंमत ४३ कोटी ९७ लाख ६ हजार ४०५ रुपयांचा चणा खरेदी करण्यात आला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड केंद्राचा फायदा होत असल्याचे स्थिती आहे
यावर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या अतिवृष्टीत अनेकांच्या जमिनीवर खरडून गेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती विशेष म्हणजे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे हरभऱ्याचे सर्वाधिक पीक घेतले जाते मात्र शेतकऱ्यांसाठी पीक आल्यानंतर खाजगी बाजारपेठेत हरभऱ्याला ४६०० रुपये च्या वर भाव मिळत नसल्याने शेतकरी हमीभाव केंद्र उघडण्याची प्रतीक्षा करू लागले होते ही बाब लक्षात घेता शासनाने नाफेडच्या वतीने आधारभूत किमती योजनेअंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून केंद्रावर १४ मार्च पासून शासकीय खरेदी सुरू करण्यात आली होती त्या करिता १२८१ शेतकऱ्यांनी केंद्रावर नोंदणी केली त्यापैकी ४७४ शेतकऱ्यांचा १ एप्रिल पर्यंत ८ हजार २४३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून शेतकऱ्यांना या केंद्रावर हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ हमीदर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
