कोच्ची, कोसारा पांदण रस्त्यावर अचानक शेड उभे केल्याने शेतकरी आक्रमक (रस्ता खुला करण्याची मागणी)

       राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

मागील बऱ्याच दिवसापासून वादग्रस्त ठरत असलेला कोची कोसारा पांदन रस्त्यावर गट नंबर 54 च्या शेतमालकाने अचानक पांदण रस्त्यावर शेड उभारणी चालू केल्याने हा रस्ता कायमचा बंद होणार म्हणून ह्या रस्त्यावर इजा करणाऱ्या शेतकरी बांधवांनी आपले बंडी बैल आणून रस्त्यावर उभे केले. घटनेची माहिती माननीय तहसीलदार साहेबांना कळविली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार यांनी तलाठी खडसे यांना घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ह्या वादावर तोडगा वरिष्ठ अधिकारी काढतील असे तलाठ्याचे  म्हणणे पडले. व घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी वडकी पोलीस स्टेशनला याची माहिती देऊन पोलीस संरक्षण मागितले.
         सकाळी सात वाजेपासून शेतकऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन सायंकाळचे सहा वाजले तरी संपले नव्हते. तसेच यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता व महत्त्वाचे म्हणजे महसूल प्रशासनाकडून कोणतेही वरिष्ठ अधिकारी नायब तहसीलदार किंवा तहसीलदार सुद्धा घटनास्थळी दाखल झाले नव्हते हे विशेष. मात्र आंदोलन शेतकऱ्यांनी आम्हाला रस्ता मोकळा करून मिळत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही ही भूमिका घेतली होती घेतली आहे. परी या आंदोलनावर हे अनिश्चित असून रस्ता बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतमाल काढणे किंवा आणणे कठीण झाले आहे.
         सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणतीही वरिष्ठ अधिकारी हजर न झाल्यामुळे यावेळी तलाठी खडसे व वडकी पोलीस स्टेशनचे विटा जमादार अरुण भोयर सह नायक चिकराम, नायक जुमानके हे घटनास्थळी हजर होते . त्या रस्त्याच्या आंदोलनावर तोडगा कधी निघेल.