उर्जा मंत्री श्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंगेस मध्ये जाहीर प्रवेश

काँग्रेस नेते मा.ना.श्री. नितीन राऊत उर्जा मंञी महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. यामध्ये रुपेश ठाकरे उपसरपंच मंगोली, झानेश्वर टोंगे सरपंच टाकळी, राजेन्द्र ठाकरे सरपंच मारेगाव, अनिल गुप्ता टाकळी, वासुदेव विधाते शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष, डॉ. मारोती मासोरकर सरपंच अडेगाव झरी, डॉ. धिरज डाहुले शिरपुर, अँड. प्रशांत उपरे, शिवसेना दहेगाव, रवी ढेंगळे बोपापुर शाखा प्रमुख शिवसेना, तसेच वणीतील विद्यमान भाजपा नगर सेवक संतोष पारखी यांनी आपल्या शेकडो कार्यकत्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी खासदार बाळुभाऊ धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार,जिल्हा बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे, अँड. देविदास काळे, नरेंद्र पाटील ठाकरे, अरुनाताई खंडाळकर, डॉ. मोरेश्वर पावडे, सुनिल वरारकर, पुरुषोत्तम आवारी, ओम ठाकुर, राजु कासावार,इजहार शेख, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर प्रमुख प्रमोद निकुरे,झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, महीला तालुका अध्यक्ष संध्या बोबडे,तालुका अध्यक्ष यु. काँ.अशोक नागभिडकर, मिडीया प्रमुख प्रदीप खेकारे, अनंतलाल चौधरी, डेव्हीड पेरकावार, व असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.