ग्रामीण भागातील विद्युत समस्यांसाठी मनसेचे धरणे आंदोलन

सहसंपादक:प्रशांत बदकी

ग्रामीण भागातील लाईन च्या समस्या तात्काळ निकाली काढा अन्यथा आंदोलन – असा इशारा मागे काही दिवसापूर्वी मनसे व मनसे विद्यार्थी सेना यांनी दिला होता.
उन्हाळ्या मध्ये शेत रिकामे असताना कुठल्याही इलेक्ट्रिक पोल दुरुस्ती व झाडे तोडणी केल्या नसल्यामुळे पावसाळ्यात वारवार वीज खंडित होत आहे ,,केशवनगर उपविभागा मध्ये येनाऱ्या शेलगाव राजगुरे व मसलापेन या दोन गावांना वायरमन नसल्या मुळे या दोन गावाकडे दुर्लक्ष होत आहे तरी लाईन मन ची या दोन गावांना नियुक्ती करावी अशी मागणी मनसे प्र.तालुका अध्यक्ष दीपक भाऊ वाघ व विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ऋषिकेश दादा ठाकूर यांनी केली या समस्या बाबत आज उपकार्यकारी अभियंता रिसोड येथे , व इजिनियर देवतळे साहेब व पोलिस स्टेशन शिरपूर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना,यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले व सात दिवसा मध्ये याची दखल घ्यावी अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा देऊन ही यांची पूर्तता झाली नाही,मानून आज दिनांक 25 जूनला मनसे ने रस्त्यावर उतरून मोटरसाइकिल रॅली काढून उपविभागामध्ये जाऊन धरणे आंदोलन केले ,यावेळी स्वतः उपस्थित मनसे प्र.जिल्हा अध्यक्ष मनीषदादा डांगे , प्र.तालुका अध्यक्ष दिपक भाऊ वाघ,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ऋषिकेश ठाकूर, वि तालुका सहसचिव नकुल दाभाडे , वाहतूक प्र.तालुका अध्यक्ष विनोद भाऊ सवाके,वी.सर्कल अध्यक्ष दत्ता जवळे,महाराष्ट्र सैनिक श्रि भाऊ देशमुख, डॉक्टर सदानंद वाघ ,ओमकार राजे महाराष्ट्र सैनिक पंकज भाऊ वाघ,संतोष माणिकराव वाघ,अमर वाघ,राजु वाघ,विशाल वाघ,सचिन वाघ,ऋषी महाराज,विनोद वाघ,सतीश खंडारे ,सिध्दार्थ जुमडे,गणेश वाघ,ओम तायडे,श्री देशमुख,वेदांत ढंवले सुहास जाधव महेश कदम आदि मनसे सैनिक उपस्थित होते