रोटरी क्लब हिंगणघाटचा पदग्रहण सोहळा रविवारी


प्रमोद जुमडे/ हिंगणघाट


हिंगणघाट :- स्थानिक रोटरी क्लब हिंगणघाटचा पदग्रहण सोहळा मोहता भवन येथे रविवारला मा.डाॅ. अनिलजी लध्दड नेत्ररोग तज्ञ नागपुर, सी .ए. राजेंद्रजी भुतडा वर्धा यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे.
सन २०२४-२५ चे नव निर्वाचीत अध्यक्ष सीए जितेंद्र वर्मा व सचिव म्हणुन सुभाषजी कटारीया,उदयजी शेंडे उपाध्यक्ष शाकिरखान पठाण शपथ ग्रहण करतील.
मावळते अध्यक्ष डाॅ.राजु निखाडे ,सचिव पितांबर चंदानी, केदार जोगळेकर हे नविन पदाधिकार्‍यांना आपला पदभार त्यांचे कडे सुपुर्द करतील. कार्यक्रमाला नवनियुक्त उप प्रांतपाल महेशजी पोद्दार वर्धा उपस्थित राहतील. रोटरी क्लबचा कार्यकाल हा एक वर्षाचा असुन मावळते अध्यक्ष हे आपल्या कार्यकाळातील केलेल्या कार्याचा आढावा प्रदर्शित करतील
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट डाॅ.अशोक मुखी प्रा.माया मिहानी, प्रा.अशोक बोंगिरवार,मंजुषा मुळे,प्रा.जितेंद्र केदार,मितेश जोशी,मुरली लाहोटी पुंडलिकजी बकाने,पंकज देशपांडे सहकार्य करीत आहे.