
नितेश ताजणे झरी :
झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनचा हद्दीत आगामी होऊ घातलेल्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार PI सुरेश मस्के साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज दिनांक १९ सप्टेंबर २०२३.रोजी मंगळवार ला मुकुटबन पोलिसांनी रुट मार्च काढण्यात आला आहे. सदर मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत दक्ष राहत पोलिसांनी मुकुटबन, गादेवार चोक, बसस्थानक मार्ग या रस्त्यावरुन हा रूट मार्च काढला. गणेशोत्सव व ईद -ए- मिलाद सणाचा कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही व सणउत्सव शांततेत पार पाडाव्यात याबाबत ठाणेदार PI सुरेश मस्के साहेब यांनी सूचना दिल्या. सदर रूट मार्च व पथसंचलनाला PSI सकवान साहेब, पोलिस कर्मचारी व होमगार्ड असे सोबत होतें. मुकुटबन शहरात पोलीसांचा रूट मार्च काढून आढावा घेण्यात आला
