हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरी करिता विधानभवन धडक,अधिवेशनामध्ये मंजूरी देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन.

चर्चेदरम्यान दिला संपूर्ण भौगोलिक क्षेत्राचा आढावा.

हिंगणघाट:- १६ डिसेंबर २०२३
वर्धा जिल्ह्याला मंजुर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट विधानसभा येथेच देण्याबाबत या मागणी करिता समस्त हिंगणघाटकरांचा नागपूर विधानभवनावर माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,संघर्ष समितीचे सचिव वासुदेव पडवे, शिवसेना (उभाठा), उपजिल्हा प्रमुख राजू खुपसरे, काँग्रेसचे प्रवीण उपासे, शिवसेना तालुका प्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात मोर्चा धडकला.
त्यावेळी मोर्चा झिरो माईल नागपूर येथे पोलिसांच्या तफ्याने अडवला त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असता शासकीय वैद्यकीय महाविद्याल्याचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावून हिवाळी अधिवेशनामध्ये हिंगणघाट येथे मंजुरी देण्याचे आश्वासन त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले व समाजसेवक श्याम ईडपवार यांचे यशवंत स्टेडियम येथे अन्नत्याग सत्याग्रह या आश्वासनानंतर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सोडवण्यात आले.
मेडिकला कॉलेज हिंगणघाट येथेच का? करिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली संपूर्ण मुद्देसूद त्यांना पटवून दिली गेल्या वर्षभरापासून झालेले आगळे वेगळे आंदोलन, निवेदन,मोर्चे तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील ३०-३५ संघटनांनी लेखी स्वरूपात देलेला पाठिंबा हा संपूर्ण आढावा तोंडी स्वरूपात तसेच फाईल तयार करून त्यावेळी त्यांना दिला व लक्ष केंद्रीत केले. ही माहिती त्यांना पटली असून त्यावेळी त्यांनी महाविद्यालय हिंगणघाट येथेच देण्यात येईल असे आश्वासन देले.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघाची लोकसंख्या अंदाजे १० लक्ष असुन दि. २७.११.२०२३च्या प्रारुप मतदार यादीनुसार मतदारांची संख्या २,९२,०७९ असुन वर्धा विधानसभेची मतदार
संख्या फक्त २,६९,६२८ आहे.वर्धा विधानसभेची मतदार संख्या २२,४५१ ने कमी असुनही वर्धेजवळ सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालयाची सुविधा उपलब्ध असुन हिंगणघाट करिता कोणत्याही व्यवसायीक उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध नाही. हा दुजाभाव टाळण्यासाठी. तसेच हिंगणघाट मध्यवर्ती ठिकाण असुन भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे. रस्ते, वीज, नदीचे पाणी, महामार्ग, रेल्वे मार्ग, बाजार पेठ ई.हिंगणघाटला राळेगांव, केळापूर, पांढरकवडा, मारेगाव, चिमुर, वरोरा, उमरेड यासारख्या तालुक्यांची सिमा लागुन असुन त्यांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होईल. आदिवासी बहुल भागाला लाभ होईल.स्वातंत्र्यपूर्व काळातील दोनही कापडगिरण्या (मील) बंद पडल्यामुळे बेरोजगारीला आळा बसुन आर्थिक स्थैर्यासाठी रोजगार निर्मिती होईल.मेडिकल कॉलेज निर्माण झाल्यास पॅरामेडिकल कोर्सेस उपलब्ध झाल्यामुळे गरीब हुशार विद्यार्थ्यांना गावातच उच्च दर्जाचे चांगले शिक्षण आल्पखर्चात उपलब्ध होईल.नामांकीत तज्ञ डॉक्टर २४ तास उपलब्ध राहतील. त्यामुळे दर्जेदार आरोग्यसेवा अल्प किमतीत मिळू शकेल.उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटच्या रुग्णांचा अॅडमिट रेटपेक्षा रेफरल रेट अधिक आहे.
अपघात प्रसंगी तात्काळ सेवा उपलब्ध झाल्यामुळे रस्त्यात दवाखाण्यात जातांना मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होईल. हिंगणघाट शहरातुन सर्वाधिक लांबीचा जम्मु काश्मीर ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अपघाताची संख्या अधिक आहे. त्यांना जलद उच्च वैद्यकीय सेवा मिळाल्यास प्राणहानीचे प्रमाण कमी होईल.
मेडिकल असोसिएशनच्या सर्व्हेनुसार वर्धा जिल्हातील एकुण औषध विक्रीच्या ४०% विक्री हिंगणघाट मध्ये होते. त्यावरुन येथील रुग्णांचा अंदाच येतो. सर्वांना चांगल्या आरोग्यसुविधा प्राप्त होईल.उपजिल्हा रुग्णालय परिसरात भरपुर जागा उपलब्ध असल्याने शासनाचे करोडो रुपयाची बचत होईल. ही जागा राष्ट्रीय महार्गावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वांच्या सोयीची आहे.महिला संघर्ष कृती समिती, मानवाधिकार सहायत्ता संघ यांची आंदोलने सुरूच आहे.या सर्वबाबी हिंगणघाट/समुद्रपूर/सिंदी (रेल्वे) ४४ विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व आरोग्याच्या हिताची असल्याने सर्व नागरीक, सामाजीक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांचे विविध प्रकारचे आंदोलने झालेली आहे. संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनाचा १५ डिसेंबर २०२३ ला २०१ वा दिवस राहणार आहे.
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, संघर्ष समितीचे सचिव वासुदेव पडवे, शिवसेना (उभाठा), उपजिल्हा प्रमुख राजू खुपसरे, काँग्रेसचे प्रवीण उपासे, शिवसेना तालुका प्रमुख सतीश धोबे, रा.काँचे शहराध्यक्ष विठ्ठल गुलघाने,जगदीश वांदीले,सुरेंद्र बोरकर,सुरेंद्र टेंभुर्णी, सिताराम भूते, प्रकाश अनासने, रमेश लोंढे, मोहम्मद इक्बाल शेख पैलवान, गुणवंत कारवटकर,सुरेश गायकवाड, शरीफ शेख,शुभम गोटे, दिलीप बालपांडे, अखिल भारतीय परिसंस्थेचे जिल्हाध्यक्ष सोनू करोशिया,माजी उपसभापती पांडुरंग किटे, पंकज साबळे,सतीश कांबळे, श्याम भोसले, विजय बोरकर,अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश मानकर,अरुण काळे, संजय मेश्राम, वैद्यनाथ पाटील,पुरुषोत्तम राऊत, सौरभ गुंडाळे, नामदेव बंडावार,संदीप ठमके, गोलू पवार, पिंटू ठाकूर, पंकज मरापे समीर मोमीडवार, पुरुषोत्तम भजगवळी,महिला संघर्ष समितीच्या विद्या गिरी, वर्धा जिल्हा काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष रागिनी शेंडे, वेदिका पोगले ,आरती निमटे, प्रणाली गजभिये,समीक्षा सातारकर, सुजाता जांभुळकर,दिपाली रंगारी, सीमा तिवारी,चंदा येलेकर, शितल येणेवार, सुनिता सेनाड, अर्चना रोंगे, विद्या जांभुळकर, सुरेखा मेश्राम,बेबी भुते,गीता मेश्राम, रत्नमाला टापरे, नंदा गोजळे, कल्पना हिवंज,ज्योती महाकाळकर, मंदाकिनी ढाले सुनीता भोयर, सुनिता तळवेकर निशा डोफे, माधुरी वाघमारे,दीपा हीवंज, सुजाता, सुनिता चंदनखेडे,ज्योती राका,अनंता गलांडे,शंकर मोहमारे,गजू काटवले,रमेश मानकर,नितीन वैद्य,बळराज डेकाटे,प्रशांत कांबळे, पप्पु आष्टीकर,दिलीप वैद्य,गोरवर्धन साहू,अविनाश धोटे,आशिष जैस्वाल,अंकित वासाड,पुरुषोत्तम गोहणे, भिकामचंद राका,अमन राका इत्यादी मोठ्या संख्येने हिंगणघाट शहरातील नागरिक सहभागी झाले होते.