धक्कादायक: क्षुल्लक कारणावरून हत्या ,आरोपी अटकेत

वरोरा शहरातील विकास नगर भागातील फुकट नगर येथे एका तरुणांची लाकडी दांड्याच्या साहाय्याने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतक तरुण रितेश लोहकरे याचे वय अंदाजे 24 इतके असून हा याच भागातील रहिवासी आहे.

घटनास्थळापासून मृतक रितेश लोहकरे याचे घर 500 मीटर अंतरावर आहे.मात्र ही घटना घडत असताना कोणालाच कसे दिसले नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.रितेश लोहकरे हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते.

दोन दिवसाआधी झालेल्या एका भांडणाचा वचपा काढण्यासाठी रितेश ला फोन करून बोलवत त्याला लाकडी दांड्याच्या साहाय्याने मारहाण केली . लाकडी दांड्याच्या साहाय्याने डोक्यावर वार करत हत्या केल्याने या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल काचोरे यांनी घटनास्थळी दाखल होत जागेची पाहणी केली. मृतक तरुणाचा मृतदेह पोस्ट मोर्टम साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास वरोरा पोलीस करत आहे.

सविस्तर घटना अशी की रितेश लोहकरे याचा दोन दिवस आधी काही कारणावरून भांडण झाले त्याचा वचपा काढण्यासाठी आज सकाळी रितेश ला फोन करत अनिमिष संजय रेड्डी याने पान ठेल्यावर बोलवून घेतले .त्यानंतर भांडणाचा वचपा काढण्यासाठी लाकडी दांड्याच्या साह्याने मारहाण केली त्या महाणीत त्याचा मृत्यू झाला.दिवसभर संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर आरोपी अनिमेष रेड्डी ,फुकट नगर याला नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले.यात चंद्रपूर गुन्हे शाखा व वरोरा पोलिस यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.