

भद्रावती तालुक्यातील माजरी गावत वत्सलभाई पोटदुखे तेलुगू
शाळेत 1996 ते 2025 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात एक मोठा तेलगू शाळेत 29 Batch चे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम 04/05/2025 रोजी आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात सर्व माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तेलंगणातून आले की सगळे आपले मित्र आणि मैत्री आणि शिक्षकाना भेटू शकतात , जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उपस्थित होते.
स्वागत समारंभात, सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देत जुन्या आठवणी ताज्या केल्या.इतक्या वर्षांनी सर्वांची भेट झाल्याने माजी विद्यार्थी खुश होते आणि पुढील 10 वर्षांसाठी आठवणीचा नवीन आठवणी घेऊन गेले.
मग सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटून जुन्या आठवणी ताज्या करून, शिक्षकांचा आशीर्वाद घेतला आणि एकत्र येत जेवणाचा आस्वाद घेतला. मोठे झाल्यावरही आम्हाला मुलांसारखे मजेदार पद्धतीने नाचण्याची संधी मिळाली त्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होते.
या स्नेहसंमेलनाचे आयोजक श्री.रामा रेड्डी ,सतीश कडुतुला ,सरिता कडुतुला यांनी केले. तेलंगणा ट्रेडिशनल बथुकम्मा
या गाण्यावर वर सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक मिळून डान्स करून कार्यक्रमाचा शेवट गोड केला.
