घरोघरी तिरंगा ध्वज लावावा:संजय डांगोरे यांचे प्रतिपादन

आज दिनांक ०४ ऑगष्ट २०२२ ला ग्राम पंचायत रिधोरा येथे हर घर तिरंगा अभियानाबाबत उपविभागीय अधिकारी साहेब, व गट विकास अधिकारी यांनी आँनलाईन झुम मिटींग द्वारे मार्गदर्शन केले. रिधोरा येथे सपन्न झालेल्या ग्राम सभेला आझादी का अम्रुत महोत्सव साजरा करन्याकरीता पंचायत समीती सदस्य तथा तिरंगा कल्यानकारी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी डांगोरे यांनी विस्तृत माहीती लोकांना दिली. यावेळी ग्राम पंचायत सरपंच नलीनीताई राऊत,उपसरपंच मोहन काळे,प्रंशात पवार,वैभव राऊत,भुषन मुसळे,वसंत तभाने,श्रीकांत गौरखेडे,निलेश डहाट यांचे सह ग्राम पंचायत सदस्य,सचीव समाधान वानखडे,तथा गावातील अंगनवीडी सेवीका,शिक्षक,आशावर्कर,पटवारी,आदी सह गावकरी उपस्थीत होते.