
स्थानीय गु गुन्हे शाखेची नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील राजस्थानी धाबा येथे कारवाई
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव ( ग्रामीण): वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचे दोन ट्रक अडवून ६५ गोवंशीय जनावरांची
सुटका करून. या कारवाईत पोलिसांनी गोवंशासह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपीला अटक केली तर एक आरोपी फरार आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकांनी दिनांक १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील भारत पेट्रोल पंपासमोर असलेल्या राजस्थानी धाब्याजवळ केली.
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री पेट्रोलिंग करीत असताना पथकास ट्रक क्रमांक एम एच ४० व्हाय ०९५१ व एम एच ०४ एच ई ३५१५ या दोन्ही ट्रकमध्ये नागपूरवरून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील सिंदोडा गावाजवळ सापळा रचला मात्र दोन्ही ट्रक हे महामार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळील खाली जागेत जय बजरंग बली राजस्थानी धाब्याजवळ असलेल्या पार्किंग मध्ये लपून आहे अशी माहिती पथकाला मिळाली लगेच त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन्ही ट्रक आढळून आले व व त्या ट्रकची तपासणी केली यावेळी दोन्ही ट्रकमध्ये ६५ गोवंशीय जनावरे व १ मृत जनावर दोरखंडाने बांधलेले दिसले.व दोन्ही ट्रकमधील आरोपी ट्रक चालक (१) शेख शहनवाज बेख महबूब (३१) रा. यशोदा नगर नागपूर,(२) शेख अरबाज शेख कलीम (२५) रा.कामठी नागपूर (३) मो.नसरुद्दीन मोहम्मद इराशादोद्दीन कुरेशी (२८) रा.कामठी नागपूर (४) मो. हसन रोशन अन्सारी (२६) रा. नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर यातील वकार कुरेशी रा. कामठी नागपूर असे फरार आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ६५ गोवंशीय जनावरे व १ मृत असे एकूण ९ लाख ८० हजार रुपये, दोन मोबाईल २० हजार रु, व दोन ट्रक किंमत २० लाख रुपये असा एकूण ३० लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जप्त केला व वरील सर्व आरोपी विरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर,पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे,निलेश निमकर,सुधीर पिदुरकर,रजनीकांत मडावी,सलमान शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
