
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बांधव हे अनेक प्रकारे आर्थिक मदतीपासून वंचित असून यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील शासनाच्या शिष्यवृत्ती योजना, घरकुल, स्वयंरोजगार व इतर आर्थिक योजना शासनाकडून राबविण्यात येतात.मात्र मोठ्या प्रमाणावर या योजनांच्या फाईल्स कार्यालयात प्रलंबित असल्याच्या तक्रारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडे सातत्याने येत असून अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले नाही तसेच मंजूर योजनांचे अनुदान वेळेवर वितरित न झाल्याने आदिवासी परिवार आर्थिक अडचणीत सापडला आहे.या बाबतीत अनेकदा कार्यालयात ये जा करून सुद्धा समाधानकारक उत्तर मिळत नाही.ही अत्यंत गंभीर बाब असून हा संबंधित कार्यालयाचा त्या परिवाराच्या आर्थिकतेशी जुळला असून या बाबतीत गांभीर्याने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अमित बेबीबाई सुर्यभान ढोबळे यांनी मा.प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांना पत्र देऊन ताबडतोब कारवाई करण्याची मागणी अमित ढोबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
