प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी

दिनांक २६/ २/ २०२३ रोजी ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा मेट येथे उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी विकास कामाच्या विविध कामाचे भूमी पूजन केले यावेळी मेट या लहान गावात संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे सुबक आणि सुंदर मंदिर होत असून याची पाहणी आमदारांनी केली होत असलेल्या सुंदर आणि दर्जेदार बांधकामावर समाधान व्यक्त केले
मेट ग्रामपंचायत इथे एकूण १ कोटी ४८ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला व येणाऱ्या भविष्यकाळात पाण्याची तीव्र अडचण बघता पाणी हा सर्वांचा मूलभूत हक्क व गरज असून त्यास अनुसरून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी २९ लाख रुपये तर मेट येथे सिमेंट रस्त्यासाठी १० लक्ष रुपये कामाचा निधी मंजूर केला तर नळ जोडणीकरिता ९ लक्ष रुपये मंजूर केले असून यावेळी विद्यमान आमदार म्हणाले पाणी वीज आणि रस्ता ह्या मूलभूत गरजा असून त्या बाबीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही व येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मेट येथे अधिकाधिक निधी उपलब्ध करून या गावाच्या विकासाला गती देऊ यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून आ नामदेव ससाने यांच्या हस्ते भूमिपूजन झाले तर प्रमुख उपस्थिती म्हणून नितीन भुतडा जिल्हाध्यक्ष भाजपा, व उत्तम राठोड माजी सैनिक, तथा माजी जिल्हा परिषद सदस्य. दत्त दिगंबर वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांची उपस्थिती होती. व विक्रम राठोड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यवतमाळ तथा तालुकाध्यक्ष सरपंच सेवा संघ उमरखेड तसेच विद्यमान सरपंच व सर्व सदस्य समस्त मेट ग्रामस्थांची उपस्थिती या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात होती
