
महागाव प्रतिनिधी / संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील अमडापुर फाट्यावर दि.१६/०४/२०२३ रोजी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला शेतीचा वाद निपटवण्या साठी गेलेल्या प्रकाश परसराम राठोड रा.चिल्ली (इजारा) यांची हत्या झाली होती.
मृतक नामे प्रकाश परसराम राठोड यास आरोपी कुंडलीक जांबुवंतराव राठोड याने पोटामध्ये चाकूचे वार करुन जबर जखमी केले व आरोपी पंडीत जांबुवंतराव राठोड याने सुद्धा लोखंडी टॉमीने डोक्यावर वार करून त्याचा दोघांनी पाठलाग करून जबर मारहाण केली होती. तसेच या घटनेतील आरोपी ची बहिण सुलाबाई दत्ता जाधव हिने सुध्दा आरोपीला प्रोत्साहन देवून गुन्हा करण्यास भाग पाडले. म्हणजेच ती या गुन्ह्यामध्ये अपराधी असून तिला अजुन अटक झाली नाही. तसेच या तिन्ही आरोपीचे वडील जांबुतराव भिक्कु राठोड हे खरे सुत्रधार असून घटना घडण्यापुर्वी पोलीस स्टेशन दराटी येथे जावून बसले होते. त्यांनीच या घटनेचा कट रचला असतांना देखील दराटी पोलीस स्टेशन येथील ठाणेदाराने फिर्यादी मध्ये त्यांचे नाव सांगीतले असतांना देखील,त्यांचे नाव वगळून टाकले सदर घटनेची साक्षदार मृतकाची पत्नी, मृतकाचे भाऊ, मृतकाचे वडील तसेच त्यांच्या सोबत असलेला ऑटो चालक राम परसराम जाधव हा सुध्दा हजर होता. व त्यानेच मोबाईल व्दारे सदर घटनेचे मोबाईल चित्रीकरण केले होते. तु चित्रिकरण का केलेस व मृतकाला दवाखान्यामध्ये का नेतोस या कारणावरुन आरोपी नामे सुलाबाई दत्ता जाधव, कुंडलीक राठोड व पंडीत राठोड यांनी त्याला सुध्दा जबर मारहाण केली. अशाप्रकारे सदर घटना ही पुर्वनियोजीत असून मृतकाची पत्नी सविता प्रकाश राठोड रा.चिल्ली (इ) यांनी पोलीस स्टेशन दराटी येथे फिर्याद द्यायला गेली असतांना माझ्या पतीची सदर घटनेत हत्या झाली असतांना देखील फिर्याद घेतांना ना-ना सवाल करून मला परेशान केले. घटनेचा कट रचनाऱ्या आरोपी वर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद केला नाही. सदर घटनेतील आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून वरील दोन्ही आरोपी पासून मला व माझे कुटूंबीयांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला असून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी सुलाबाई दत्ता जाधव व जाबुवंतराव भिक्कु राठोड यांच्यावर गुन्हा नोंद करुन तात्काळ अटक करुन आम्हाला न्याय देण्यात यावा. असा आरोप दराटी पोलिसांन वर करत तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ यांच्या कडे सविता प्रकाश राठोड यांनी केली आहे.
