
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जि प शाळा येवती येथे शिक्षण सप्ताह स्नेह भोजन व निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी राजू काकडे गट शिक्षणाधिकारी पं स राळेगाव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुरेश शिंदे सर सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक शाल , श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कुणाल सरोदे सर यांची गुजरी येथे विषय शिक्षक म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचा शाल व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ भोयर अध्यक्ष तसेच कीसनराव कोल्हे उपाध्यक्ष, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच अंगन वाडी सेविका तसेच सौ.गीताबाई पढाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.माकोडे मॅडम यांनी केले. तर प्रास्तविक मुख्याध्यापक चालखुरे सर यांनी केले.आभार कु बोंदाडे मॅडम यांनी केले.